जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी साहित्य डोनेशनसाठी नागरिकांना आवाहन
प्रिय नागरीक,

सद्यस्थितीत कोविड-१९ म्हणजेच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा नेहमीप्रमाणे सुरु करणे शक्य नाही. शाळा जरी बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु राहणे जरुरी आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण हा चांगला पर्याय आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठीचे सर्व अभ्यासक्रम, शैक्षणिक साहित्य व शैक्षणिक व्हिडियो प्रत्येक शाळेतील शिक्षकाकडे उपलब्ध आहे. पण अशा प्रकारे अध्ययन करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडे Android मोबाईल फोन / स्मार्ट टीव्ही / जुना टॅब / लॅपटॉप / डेस्कटॉप कंप्युटर असणे जरुरीचे आहे.

 शिक्षणापासून कोणीही गरजू विद्यार्थी मागे राहू नये ही आपली सगळ्यांचीच सामाजिक भावना आहे. आपला एक मदतीचा हात अशा सर्व गरजू मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी मोलाचा ठरणार आहे.

आपणा सर्वाना एक नम्र आवाहन आहे की, आपल्याकडील सुस्थितीतील चालू आणि अतिरिक्त असलेला परंतु आपल्या सध्या वापरात नसलेला Android मोबाईल फोन / स्मार्ट टीव्ही / जुना टॅब / लॅपटॉप / डेस्कटॉप कंप्युटर आपण अशा विद्यार्थ्यांसाठी नक्की देऊ शकता जेणेकरून असे गरजू विद्यार्थी या कोरोना च्या संकट काळात सुद्धा आपले शिक्षण सुरु ठेवतील.

कृपया आपण विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षण साहित्यासंदर्भात वरीलप्रकारे जुने / नवे साहित्य देऊ इच्छित असल्यास आम्हाला इथे माहिती भरून नक्की कळवा जेणेकरून आम्ही आपणास संपर्क करू.    

Sign in to Google to save your progress. Learn more
आपले संपूर्ण नाव *
आपला मोबाईल क्रमांक *
आपण कोणत्या भागात रहात आहात? *
आपण काय डोनेशन देऊ इच्छित आहात? *
Required
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy