यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार वितरण सोहळा २३ एप्रिल २०२२ उपस्थिती नोंदणी फॉर्म.
यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे पुरस्कार वितरण सोहळ्यात उपस्थिती नोंदवण्यासाठी गूगल फॉर्म द्वारे नोंदणी करणे  गरजेचे आहे.

पुरस्कार वितरण सोहळा  दुपारी २:३० ते ५: ३० दरम्यान, रंगस्वर  सभागृह, ४ था मजला, यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई, जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, मंत्रालय समोर, मुंबई -४०००२१ येथे असेल.

पुरस्कार संबंधित तपशील खालील प्रमाणे
पाच क्षेत्रांमध्ये यशस्वी कामगिरी करणाऱ्या १४ युवक-युवतींची निवड !
पुरस्कार

मुंबई (दि.२०) : यशवंतराव चव्हाण सेंटर,मुंबईच्या नवमहाराष्ट्र युवा अभियानातर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार २०२१’ ची घोषणा करण्यात आली आहे.चव्हाण सेंटरच्या माध्यमातून युवांसाठी सातत्याने सर्जनशील व प्रोत्साहनपर उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून सामाजिक, क्रीडा, उद्योजकता,रंगमंचीय कलाविष्कार व साहित्य या क्षेत्रांतील विविध गुणवंत युवांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.  

या राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण, जागतिक पुस्तक दिनी शनिवार दिनांक २३ एप्रिल २०२२ रोजी दुपारी  ०२:३० ते ०५:३० यावेळेत  रंगस्वर सभागृह, यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई -२१ येथे MKCL चे प्रमुख विवेक सावंत  यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. सर्व पुरस्कारांचे स्वरूप रुपये एकवीस हजारांचा धनादेश,सन्मानचिन्ह असे असणार आहे.

यंदाचा २०२१ सालाचे युवा क्रीडा पुरस्कार आंतरराष्ट्रीय क्रीडापटू राही सरनोबत (नेमबाज,कोल्हापूर),स्वरूप उन्हाळकर (पॅरालॉंपिक,कोल्हापूर),अविनाश साबळे(धावपटू,बीड) यांना जाहीर झाला आहे.या पुरस्काराच्या निवड समितीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रीडापटू अंजली भागवत,क्रीडा पत्रकार शैलेश नागवेकर,संजय घारपुरे,विजय साळवी व शंतनू सुगवेकर यांचा समावेश होता.

सामाजिक युवा पुरस्कारात सामजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या छाया भोसले (श्रीगोंदा,अहमदनगर) व रवी चौधरी (औरंगाबाद) यांची निवड करण्यात आली आहे.या निवड समितीमध्ये अनिकेत आमटे,प्रा.हमीद दाभोळकर,दीपक नागरगोजे, मुमताज शेख व दीप्ती राऊत यांचा समावेश होता.

महाराष्ट्राला कला-साहित्याची मोठी परंपरा आहे. अनेक कलांचे उगमस्थान असलेल्या या भूमीतील रंगमंचीय कलाविष्कार (परफॉर्मिंग आर्ट्स) सादर करणाऱ्या युवक-युवतींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये नाट्य विभागात अक्षय शिंपी (मुंबई),शास्त्रीय नृत्य विभागात स्वरदा भावे (पुणे), लोककला विभागात शुभम अवधूत,पोवाडा (सांगली), तर शास्त्रीय संगीत विभागात यशवंत वैष्णव,तबलावादक (मुंबई) या चौघांना जाहीर झाले आहे.या पुरस्काराच्या निवड समितीत प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे,ज्येष्ठ रंगकर्मी अजित भुरे,प्रसिद्ध नृत्यांगना शर्वरी जमेनिस,लोककला अकादमीचे प्रमुख डॉ.गणेश चंदनशिवे व प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे यांचा समावेश होता.

मराठी भाषेत मागील पाच वर्षांत साहित्यकृतींचे लिखाण करणाऱ्या युवक व युवतींना साहित्य युवा पुरस्कार २०२१ देऊन गौरव करण्यात येत आहे. या पुरस्कारांमध्ये सोलापूरच्या ऐश्वर्या रेवाडकर (पुस्तक : बिजापूर डायरी) व बार्शी येथील ज्ञानेश्वर जाधवर (पुस्तक : येसन) यांची निवड करण्यात आली आहे.
या निवड समितीत प्रा.प्रज्ञा दया पवार,सोनाली नवांगुळ,प्रा.ऐश्वर्य पाटेकर,डॉ.कैलास अंभूरे व बालाजी मदन इंगळे यांचा समावेश होता.

आपल्या उद्योगाच्या माध्यमातून कमीत कमी पाच वर्षांत यशस्वीपणे आपला उद्योग चालवत,त्यात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत,पर्यावरणीय समतोल व शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्या उद्योग धंद्यात विविध प्रयोग करीत तसेच रोजगाराची निर्मिती करीत आपल्या भागात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या मिनाक्षी वालके (चंद्रपूर), अश्विन पावडे (औरंगाबाद/अकोला) व सोनाली गराडे (नाशिक) या युवा उद्योजकांना ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय उद्योजकता पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.या निवड समितीमध्ये आनंद अवधानी,सुनील किर्दक,दीपाली चांडक व मनोज हाडवळे यांचा समावेश होता.


आपणास कार्यक्रमाची रूपरेषा आपणास नोंदणी पूर्ण झाल्यावर पाठवण्यात येईल.

अधिक माहिती साठी संपर्क
संतोष मेकाले
९८६०७४०५६९


(दत्ता बाळसराफ)
मानद कार्यक्रम व्यवस्थापक
Sign in to Google to save your progress. Learn more
नाव *
मोबाइल नंबर *
एमेल आयडी *
संपूर्ण पत्ता *
जिल्हा *
आपण विद्यार्थी आहात का ? *
विद्यार्थी असाल तर कॉलेज चे नाव व संपूर्ण पत्ता
आपण नोकरी किंवा व्यवसाय करता का ?
व्यवसाय / नोकरी तपशील
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This form was created inside of Yashwantrao Chavan Centre, Mumbai. Report Abuse