समाजबंध कार्यकर्ता नोंदणी
कृपया form भरण्याआधी खालील माहिती नक्की वाचा.

समाजबंध बद्दल थोडक्यात :

समाजबंध ही संविधानिक मूल्यांवर चालणारी, मासिक पाळी व महिला आरोग्यावर २०१६ पासून काम करणारी युवकांची सामाजिक चळवळ असून ग्रामीण व आदिवासी भागात काम करते.
आजही देशातील निम्म्याहून अधिक महिला मासिक पाळीच्या काळात स्वच्छ शोषक साहित्य वापरत नाहीत, त्यामुळे महिलांना बऱ्याच आजारांना सामोरे जावे लागते. त्यातून गर्भाशयाचा कॅन्सर सारखे गंभीर आजार ही काही महिलांना होतात. तसेच या बाबतीत असणाऱ्या अंधश्रद्धा, पाळी आल्यानंतर मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण या समस्या आहेतच. मासिक पाळी व्यवस्थापन या विषयावर जनजागृती करण्यासाठी व त्यांना परवडेल व सहज उपलब्ध होईल अशा पॅडचा पर्याय देण्यासाठी समाजबंध ही संस्था काम करते.
समाजबंधचा कापडी आशा पॅड निर्मिती प्रकल्प पुण्यात घोरपडी येथे तर दुसरा प्रकल्प हेमडी (ता.पेण, रायगड) येथे आहे. समाजबंधचे संस्थापक सचिन-शर्वरी हे दांपत्य असून ते रायगड येथेच राहून तेथील काम पाहतात. - आजवर महाराष्ट्रातील २०० हून अधिक शाळा, बचत गट, गावं यांच्यासोबत 'प - पाळीचा: जागर स्त्री अस्तित्वाचा' हे सत्र घेण्यात आले असून यामध्ये मासिक पाळीविषयी शास्त्रशुद्ध माहिती देऊन पाळीविषयी शास्त्रीय दृष्टिकोन तयार करण्यावर भर दिला जातो.
- त्यानंतर महिला व मुलींना प्रकल्पात जुन्या कपड्यांपासून बनवलेले कापडी पॅड एकदा मोफत वापरायला दिले जातात.
- तसेच असे पॅड स्वतः बनवण्याचे प्रशिक्षण ही दिले जाते; जेणेकरून महिला ते बनवून कायमस्वरूपी वापरू लागतील आणि आरोग्य राखले जाईल.
समाजबंध कमीत कमी संसाधनात काम करते म्हणून बहुतांश कामे ही लोकसहभाग व Volunteering च्या जोरावरच चालतात; आपणही या परिवर्तनाच्या चळवळीचा भाग व्हाल ही अपेक्षा.
Sign in to Google to save your progress. Learn more
Next
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy