पुणे महानगरपालिका आणि पुण्यातील सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त साजरा होणाऱ्या स्वच्छता सप्ताहासाठी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन दरवर्षी केले जाते.
यातीलच एक उपक्रम म्हणजे पेहेल-2023 अर्थात शहर स्तरावर राबवण्यात येणारे ई-कचरा व प्लास्टिक संकलन महाअभियान! शहरातील ई-कचरा आणि प्लास्टिक कचऱ्याचे सुयोग्य व्यवस्थापन आणि त्याद्वारे पर्यावरण संवर्धन हा या महाअभियानाचा हेतू आहे.या महाअभियानासाठी स्वयंसेवक नोंदणी सुरू झाली आहे. सर्व नागरिकांना आवाहन आहे की, स्वयंसेवक म्हणून नोंदणी करण्यासाठी खालील गुगल फॉर्म भरावा व स्वच्छता सप्ताहानिमित्त आयोजित पेहेल-2023 या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे.
On the occasion of Saint Gadge Baba Jayanti Swachhata Saptah is celebrated every year. Pune municipal Corporation and social organisations in Pune city cordially organise many activities each year. One of the activities is PEHEL-2023 i.e. Plastic and E-waste Handling for Eco-friendly Lifestyle. This activity refers to E-waste and Plastic collection drive at City level & the purpose behind is to manage E-waste and plastic waste through proper system.
Citizens can engage as volunteers for making the drive more successful. We appeal to all residents to participate in this initiative & fill up the Google form given below to register as volunteer. Be the part of PEHEL-2023 and help environment conservation.