दापोली तालुक्यासाठी लेख, व्हिडिओ, फोटो यांची आगळीवेगळी स्पर्धा
‘कोकणाला प्राचीन इतिहास नाही’असे शासकीय प्रतिनिधींच्या तोंडून ऐकल्यावर सत्तरच्या दशकात पन्हाळेकाजीतील एकोणतीस लेण्यांचा समूह आणि तब्बल नऊ ताम्रपट यांचे संशोधन करणारे दाभोळचे नामवंत इतिहाससंशोधक आणि पुराणवस्तू संग्राहक अण्णा शिरगावकर यांचे वयाच्या त्र्याण्णवव्या वर्षी (11 ऑक्टोबर) निधन झाले. त्यांनी जीवनभर अभ्यासक व संशोधक यांच्या सहकार्याने उपलब्ध पुराणवस्तूंचे चिकित्सक वृत्तीने परीक्षण करून कोकणच्या इतिहासाचा पाया रचण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. दापोली तालुका ही त्यांची कर्मभूमी होती. त्यांची आठवण म्हणून ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या दापोली तालुका माहिती संकलन मोहिमेतर्फे काही स्पर्धा योजण्याचे आखले आहे. दापोली तालुक्यातील संस्कृतिसंचित नोंदण्याचे काम ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ने हाती घेतलेलेच आहे.वाटले असे, की अण्णांच्या संशोधनकार्याला आदरांजली म्हणून या माहिती संकलनास लेखन व अन्य स्पर्धा योजून गती द्यावी. कोकण मराठी साहित्य परिषदेनेही या योजनेस पाठिंबा दिला.

. निबंध स्पर्धा :
विषय : माझे गाव
(गावगाथा)
दापोली तालुक्यातील कोणतेही गाव, गावातील वैशिष्ट्यपूर्ण असे देवस्थान – उत्सव – प्रथा-परंपरा – यात्रा-जत्रा – गावातील कर्तबगार व्यक्ती – घराणी वा उपक्रमशील संस्था अशा कोणत्याही विषयावर बाराशे-पंधराशे शब्दांत लेख लिहून पाठवणे अपेक्षित आहे.

या स्पर्धेत भाग घेण्यासाठी सोबतचा फॉर्म भरावा. लेखस्पर्धेत पहिल्या क्रमांकाच्या लेखास 2000 रुपये दुसऱ्या क्रमांकाच्या लेखास 1500 रुपये व तिसऱ्या क्रमांकाच्या लेखास 1000 रुपये बक्षीस असणार आहे. उत्तेजनार्थ पाच बक्षिसे प्रत्येकी पाचशे रुपये.

गावाची माहिती लिहिताना पुढील मुद्दे लेखात समाविष्ट करता येतील – 

गावाचा तालुका आणि जिल्हा कोणता? गावाच्या नावाच्या उत्पत्तीची दंतकथा आहे का? गावात कोणकोणती मंदिरे आहेत? ग्रामदैवताचे नाव काय? त्याची माहिती. ग्रामदैवताच्या नावाने जत्रा किंवा यात्रा आहे का? ती कशी आयोजित-साजरी केली जाते? गावाचा इतिहास, स्थानिक कला आणि उत्सव, गावात वा गावाजवळ असलेली लेणी-किल्ले किंवा इतर ऐतिहासिक-पुरातन वास्तू, शिलालेख, तेथील आठवडी बाजार, गावात बनवला जाणारा वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थ, सण साजरे करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती, गावात असलेल्या किंवा होऊन गेलेल्या उल्लेखनीय व्यक्ती, गावातील संस्था किंवा उपक्रम, गावाची लोकसंख्या, गावातील लोकांची भाषा-बोलीभाषा, गावातील नदी-तलाव, पावसाचे प्रमाण, शिक्षणाची सोय, पाणी आणि पिके यांची स्थिती, हवामान, पर्यटन स्थळ, गावातील इतर व्यवसाय, गावापर्यंत पोचण्याची वाहतूक व्यवस्था व मार्ग, चार-पाच किलोमीटर परिसरातील काही गावांची नावे, तसेच, गावाची इतर वैशिष्ट्ये! सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तेथील माणसे – त्या माणसांच्या हकिगती, त्यांची कर्तबगारी. गावचा नकाशा आणि भरपूर फोटो... (लेख कल्पनारम्य नसावा. वस्तुस्थिती असावी. सत्यासत्यता तपासली जाईल. ती ललित भाषेत वर्णन केल्यास विशेष पसंती.)

ब. व्हिडिओ स्पर्धा : 
विषय : दापोलीतील गावांची माहिती, कर्तबगार व्यक्ती वा उपक्रमशील संस्था, ऐतिहासिक ठिकाणे, देवस्थान, मंदिरे, सण-उत्सव, यात्रा-जत्रा, प्रथा-परंपरा, स्थानिक सांस्कृतिक जीवन, निसर्गवैभव अशा कोणत्याही विषयावर तीन ते चार मिनिटे कालावधीचा व्हिडिओ तयार करणे.

व्हिडिओ स्पर्धेत पहिल्या क्रमांकाच्या व्हिडिओस 3000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या व्हिडिओस 2000 रुपये व तिसऱ्या क्रमांकाच्या व्हिडिओस 1000 रुपये बक्षीस असणार आहे.

याशिवाय, स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येकास विशेष पारितोषिक मिळू शकणार आहे. आयोजकांनी सुचवलेल्या सुधारणा व वाढीव तपशील यांसह लेख वा व्हिडिओ पाठवल्यास संपादकांच्या सुचनेनुसार तो ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या पोर्टलवर स्पर्धकाच्या छायाचित्र-अल्पपरिचयासह प्रसिद्ध करण्यात येईल व त्यासाठी मानधन मिळेल.

क. फोटोग्राफी स्पर्धा :
विषय : दापोलीतील ऐतिहासिक ठिकाणे, मंदिरे, सण-उत्सव, यात्रा-जत्रा, प्रथा-परंपरा, स्थानिक सांस्कृतिक वैशिष्ट्ये टिपणारे फोटो आणि त्याबाबतची थोडक्यात माहिती असे असावेत.

फोटोग्राफी स्पर्धेत अनुक्रमे 2000, 1500 व 1000 रुपये बक्षीस असणार आहे.
या स्पर्धांत भाग घेण्यासाठी वयाची अट नाही. स्पर्धकांनी त्यांचे साहित्य 10 डिसेंबरपर्यंत पाठवावे.

‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या तालुकावार माहिती संकलन मोहिमेस ‘परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशन’चे सहकार्य लाभले आहे.
स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी संपर्क - अश्विनी भोईर 8830864547, नितेश शिंदे 9892611767
इमेल - info@thinkmaharashtra.com  वेबसाईट - www.thinkmaharashtra.com

Sign in to Google to save your progress. Learn more
स्पर्धकाचे संपूर्ण नाव
*
स्पर्धकाचा मोबाईल क्रमांक
*
इमेल आयडी (E-mail) *
स्पर्धकाचा संपूर्ण पत्ता (पिनकोडसह)
*
स्पर्धा विभाग
*
स्पर्धेसंबंधी
माझे गाव (गावगाथा) : दापोली तालुक्यातील कोणतेही गाव, गावातील वैशिष्ट्यपूर्ण असे देवस्थान – उत्सव – प्रथा-परंपरा – यात्रा-जत्रा – गावातील कर्तबगार व्यक्ती – घराणी वा उपक्रमशील संस्था अशा कोणत्याही विषयावर बाराशे-पंधराशे शब्दांत लेख लिहून पाठवणे अपेक्षित आहे.

व्हिडिओ स्पर्धा :  दापोलीतील गावांची माहिती, कर्तबगार व्यक्ती वा उपक्रमशील संस्था, ऐतिहासिक ठिकाणे, देवस्थान, मंदिरे, सण-उत्सव, यात्रा-जत्रा, प्रथा-परंपरा, स्थानिक सांस्कृतिक जीवन, निसर्गवैभव अशा कोणत्याही विषयावर तीन ते चार मिनिटे कालावधीचा व्हिडिओ तयार करणे.

फोटोग्राफी स्पर्धा :  दापोलीतील ऐतिहासिक ठिकाणे, मंदिरे, सण-उत्सव, यात्रा-जत्रा, प्रथा-परंपरा, स्थानिक सांस्कृतिक वैशिष्ट्ये टिपणारे फोटो आणि त्याबाबतची थोडक्यात माहिती असे असावेत.
लेख किंवा व्हिडियोचा विषय
*
तुम्ही 'थिंक महाराष्ट्र'ची वेबसाईट पाहिली आहे का? नसल्यास सोबतच्या लिंकवरून पहावी. तुमचे मत कळवावे. https://www.thinkmaharashtra.com/ *
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This form was created inside of Think Maharashtra. Report Abuse