सध्याचे युग हे " स्पर्धेचे युग " आहे आणि या स्पर्धेच्या युगात जर टिकून यश संपादन करायचे असेल तर विद्यार्थ्यांची तयारी आत्मविश्वासपूर्वक असली पाहिजे . त्यात सामान्य ज्ञान हा विषय " थेंबे थेंबे तळे साचे" याप्रमाणे हळूहळू वृद्धिगत होत जाणारा विषय आहे. त्यामुळेच हा सामान्य ज्ञान चाचणी हा उपक्रम सुरु करीत आहे .मुलांना विविध विषयासाठी संदर्भ शोधण्याची सवय लागून स्पर्धा परीक्षेच्या वातावरणात मुलांना घेउन जाण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त आहे .