जागतिक दिव्यांग दिनानिमित्त परिसंवाद - बढते कदम की ओर ...  

सस्नेह निमंत्रण....

आधुनिक आणि समृद्ध समाजाच्या निर्मितीसाठी सर्व घटकांना समान संधी निर्माण करून देणं हे यशवंतराव चव्हाण सेंटर या संस्थेचं ध्येय ! सेवाभाव, सर्जनशीलता, उत्तरदायित्व, विश्वासार्हता, प्राविण्य ही मूल्य जपत गेल्या तीन दशकांहून अधिक काळ यशवंतराव चव्हाण सेंटरचा प्रवास सुरू आहे. संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या मृत्यूनंतर यशवंतरावांचे अनुयायी, कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यातूनच १७ सप्टेंबर, १९८५ रोजी मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईची स्थापना झाली. म्हणजेच आताचे यशवंतराव चव्हाण सेंटर होय. या धर्मनिरपेक्ष, पक्षनिरपेक्ष मंचावर विविध सामाजिक प्रश्नांची चर्चा व्हावी आणि या चर्चेच्या माध्यमातून कार्य करणारी माणसं तयार व्हावीत या उदात्त ध्येयानं यशवंतराव चव्हाण सेंटरचा प्रवास अखंडपणे सुरु आहे.

शिक्षण, आरोग्य दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक, युवा, महिला, सांस्कृतिक विभाग तसेच यशवंतराव चव्हाण रिसर्च सेंटर ऑफ सोशल सायन्स, यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय ग्रंथालय, ग्रंथ प्रकाशन आणि माहितीपट, यशवंतराव चव्हाण माहिती व तंत्रज्ञान प्रबोधीनी, कायदेविषयक मोफत सहाय्य आणि सल्ला फोरम, आदिवासी विकास केंद्र अशा विविध विभागांतर्फे यशवंतराव चव्हाण सेंटर या संस्थेचं कार्य सुरू असून मुंबई, कराड, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नांदेड, सोलापूर, नागपूर, अमरावती यांसह राज्याच्या विविध भागात चव्हाण सेंटरची जिल्हा केंद्र कार्यरत आहेत.

आरोग्य, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक  विभागाच्या वतीने शोध आनंदी जीवनाचा, राज्यस्तरीय आरोग्य परिषद, ज्येष्ठ नागरिक व ज्येष्ठ नागरिक संघ अथवा संस्था यांना पुरस्कार, ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृती कार्यशाळा, मानसिक आरोग्य चांगले रहावे यासाठी फिल्म स्क्रीनिंग आणि चर्चा आदि उपक्रम राबवले जातात. यासोबतच दिव्यांग प्रवर्गाला शासकीय योजनांचा थेट लाभ व्हावा यासाठी आणि या प्रवर्गाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विभागाच्या वतीने सातत्याने प्रयत्न होत असतात. दिव्यांगांसाठी जनजागृती कार्यक्रम, दिव्यांगांसाठी शासकीय योजनेचा लाभ मिळविण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या युडीआयडी कार्ड वाटप, दिव्यांगांसाठी आरोग्य शिबिरे व सहाय्यभूत कृत्रिम साधनांचे वाटप यासोबतच कर्णदोष असलेल्यांसाठी मोफत डिजिटल श्रवणयंत्र तपासणी आणि वाटप यांसारखे उल्लेखनीय उपक्रम या विभागाच्या माध्यमातून पार पडतात. यासोबतच या विभागाच्या वतीने दिव्यांग विवाह सोहळ्याचे देखील आयोजन करण्यात येते.

दिव्यांगावर मात करून प्राविण्य मिळविलेल्या व्यक्तींचा परिसंवाद व त्याच बरोबर दिव्यांग क्षेत्रातील स्वयंरोजगार, शिक्षण, योजना, नाविण्यता, साहित्य व सुगम्यता या विषयांवर तज्ञ मंडळींच्या वतीने चर्चा करण्यात येणार आहे.  आपण या कार्यक्रमास सादर निमंत्रित आहात. कृपया आपला अमूल्य वेळ द्यावा ही नम्र विनंती

 

दिनांक : ०९ डिसेंबर २०२३

स्थळ: रंगस्वर सभागृह, चौथा मजला, यशवंतराव चव्हाण सेंटर

वेळ: सकाळी ०९.०० वाजता

आपले,

विजय कान्हेकर

संयोजक

आरोग्य दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक विभाग

 दिपीका शेरखाने

विभाग प्रमुख

आरोग्य दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक विभाग

Sign in to Google to save your progress. Learn more
नाव  *
मोबाईल नंबर  *
इमेल  *
कार्यक्षेत्र  ( area of ​​work) *
Required
संस्थेचे नाव  *
कार्यक्रमाची माहिती कुठून मिळाली  *
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This form was created inside of Yashwantrao Chavan Centre, Mumbai. Report Abuse