लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी (जि. यवतमाळ)
नमस्कार पालक आणि विद्यार्थी मित्रांनो,
सध्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे आपले सामान्य जनजीवन बदलले आहे. या अनुषंगाने या व्यासपीठा द्वारे वणी परिसरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सुरु असलेले महाविद्यालय आपणापर्यंत येत आहे. आपण या द्वारे लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी (जि. यवतमाळ) येथे वरिष्ठ अभ्यासक्रम शैक्षणिक सत्र 2021-2022 करीता प्रवेश पूर्व नोंदणी करू शकता.
सदर सुविधा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याचा विचार करून महाविद्यालया द्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी विद्यार्थ्यांनी प्रवेश-नोंदणी प्रकीयेच्या माहिती करिता आपली नोंदणी करून घ्यावी.
टीप:- सदरील नोंदणी प्रवेश पूर्व प्रक्रिये करीता नोंदविण्यात येत आहे.
सदर गुगल फॉर्म भरताना काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास आपण खालील भ्रमणभाष क्रमांकावर संपर्क साधू शकता.
विजय उपाध्ये 7218569064 / 9637692436